U19 World Cup AUS vs IND Final Live Score : रविवारी (11 फेब्रुवारी) अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. दोन्ही संघ तिसऱ्यांदा विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येत आहेत. भारताने याआधी 2012 आणि 2018 च्या फायनलमध्ये त्यांना पराभूत केले होते. टीम इंडियाने आतापर्यंत पाच वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया तीन वेळा चॅम्पियन बनला आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 19 वर्षाखालील विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 254 धावांचे लक्ष्य दिले आहे. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 253 धावा केल्या.
Innings Break!#TeamIndia need 2⃣5⃣4⃣ to win the #U19WorldCup!
3⃣ wickets for Raj Limbani
2⃣ wickets for Naman Tiwari
A wicket each for Saumy Pandey & Musheer KhanOver to our batters 🙌
Scorecard ▶️ https://t.co/RytU4cGJLu#U19WorldCup | #INDvAUS pic.twitter.com/4SnelO2HMi
— BCCI (@BCCI) February 11, 2024
ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगने अर्धशतक झळकावले. त्याने 64 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 55 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्णधार ह्यूने 48 धावांची शानदार खेळी केली. हॅरी डिक्सनने 42 धावा केल्या. याशिवाय ऑलिव्हर पीक 46 धावांवर तर टॉम स्ट्रेकर 8 धावांवर नाबाद राहिला.
टीम इंडियासाठी गोलंदाजीत राज लिंबानीने 10 षटकात 38 धावा देत 3 बळी घेतले. नमन तिवारीने 2 बळी घेतले. सौम्या पांडे आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.