पाटण – कोयना धरणातून आज दिनांक २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कोयना नदीमध्ये २१०० क्यूसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्याचे नियोजन आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू करणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.