उत्तर प्रदेशात पावसाचे 7 बळी

सीतापूर (उत्तर प्रदेश)   – उत्तर प्रदेशात पावसामुळे झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे छत आणि भिंत कोळल्याने मरण पावलेल्या काही जणांचा यामध्ये समावेश आहे.

 उत्तर प्रदेशातल सीतापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या दुर्घचना झाल्या आहेत. एकूण 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जण मरण पावले असल्याचे सीतापूर जिल्हा दंडाधिकारी निशाल भारद्वाज यांनी सांगितले.

पावसामुळे झालेल्या या जीवितहानबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दुर्घटनांमधील पीडीत व्यक्तींना मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी रवाना व्हावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यान दिल्या आहेत.

लक्ष्मीनपूर गावात बुधवारी पहाटे भिंत व लोखंडी शेड कोसळून एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आणि अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. मरण पावणाऱ्यांपैकी तिघेजण एकाच कुटुंबातील आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले.

नानकारी गावात भिंत कोसळून एक दाम्प्÷य मरण पावले. तर सदरपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत छत कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.