सातारा – जिल्ह्यात नवे 1012 जण करोनाबाधित

पुन्हा वाढली चिंता; 14 बाधितांचा मृत्यू, 176 जणांना डिस्चार्ज

सातारा  -जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1012 नागरिकांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णांलयांतून आणि करोना केअर सेंटरमधून बुधवारी संध्याकाळपर्यंत 176 जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

आजच्या या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 15 (9101), कराड 267 (32935), खंडाळा 66 (12622), खटाव 101 (21041), कोरेगाव 71 (18312), माण 76 (14134), महाबळेश्‍वर 10 (4446), पाटण 12 (9351), फलटण 138 (29851), सातारा 188 (43144), वाई 63 (13800) व इतर 5 (1567). जिल्ह्यात आजअखेर बाधितांची एकूण संख्या आता दोन लाख 10 हजार 904 इतकी झाली आहे.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या आणि आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 0 (191), कराड 3 (993), खंडाळा 2 (160), खटाव 1 (500), कोरेगाव 0 (396), माण 1 (291), महाबळेश्‍वर 0 (85), पाटण 0 (316), फलटण 1 (492), सातारा 4 (1294), वाई 2 (313) व इतर 0 (71). आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5102 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.