Lok Sabha Elections 2024: देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) धामधूम सुरु आहे. सर्वच पक्षांचे प्रचारांचे कार्यक्रम जोरात सुरु आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला विदर्भातील गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आहेत. (PM Modi In Maharashtra) चंद्रपुरात त्यांची लाईव्ह सभा सुरु आहे..