ढाका – भारतीय संघाचा माजी कसोटी क्रिकेटपटू वासीम जाफर याची बांगलादेश क्रिकेट मंडळाने गेम डेव्हलपमेंट विंगमध्ये नियुक्ती केली आहे. आता येत्या काळात त्यांच्या संघाला जाफरचे मार्गदर्शन लाभणार आहे.
जाफरने याआधी 2019 साली त्यांच्या संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून काम केले होते. त्याने 16 व 19 वर्षाखालील खेळाडूंना मार्गदर्शन केले होते. आता तो गेम डेव्हलेपमेंट विंगशी जोडला जाणार असून 19 वर्षाखालील संघासोबत बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या हाय फरफॉर्मेंस सेंटरमध्ये काम करणार आहे.
जाफरने ओडिशाच्या संघाचा मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडली आहे. गेल्या वर्षी ओडिशा क्रिकेट संघटनेने त्याला दोन वर्षासाठी करारबद्ध केले होते. त्यानंतर जाफरची उत्तराखंडसंघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र संघटनेशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.