संजीवराजे ना. निंबाळकर; फलटण येथे उत्साहात प्रकाशन
सातारा : प्रा.डॉ.सुजित सुर्यकांत जाधव व सहकारी प्राध्यापकांच्या लेखणीतून प्रकाशित झालेले प्रॅक्टिकल हॅन्डबुक हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या ऑगस्ट २०२३ पासून बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ( NEP -2020)B. Sc. Plant Protection च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पेपर एक ते चार साठी उपयुक्त असे Practical Handbook हे पाचवे पुस्तक नुकतेच पुण्याच्या सस्केस पब्लिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे.
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच फलटण संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी एस.बी.आर. महाविद्यालय म्हसवडचे प्राचार्य डॉ. संतोष कदम, प्रा .डॉ. सुजीत जाधव, प्रा. डॉ. प्रज्ञा माने, प्रा. अनिल लांब, प्रा.प्रविण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवाजी विद्यापीठांतर्गत BSc- II च्या विद्यार्थ्यांसाठी प्लांट प्रोटेक्शन हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरणार असून यामध्ये संस्थेच्या म्हसवड येथील एस. बी. आर. महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुजीत जाधव यांच्यासह वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांचा असणारा सहभाग संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचे संजीवराजे यांनी सांगितले.