देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरामध्ये वारकरी भागवत पताका स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभावर 10 बाय 15 फूट वारकरी ध्वज असणार आहे. त्याचे ध्वजारोहण व पूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.
या स्तंभाची उंची 61 फूट असून 8 इंचाचा व्यास आहे. स्तंभाचे फाउंडेशन 10 फूट खोल घेण्यात आले आहे. हा ध्वज पूर्णपणे 6 एमएम स्टील कोटिंगमध्ये व अत्याधुनिक पद्धतीमध्ये तयार करण्यात आला असून यावर वातावरणाचा दीडशे वर्षांपर्यंत कोणताही परिणाम होणार नाही. ही पताका 10 बाय 15 फुटाची असणार आहे.
ही पताका लावण्यासाठी अथवा काढण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला स्तंभावर चढण्याची आवश्यकता नसून वैशिष्ट्यपूर्ण अत्याधुनिक पद्धतीने पताका वर चढविणे अथवा उतरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.