ओबीसी नेत्यांनी फिरविली पाठ : आरक्षणाची उत्सुकता संपली
शिरूर – शिरुर नगरपरिषद निवडणुकीकरिता प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती प्रवर्ग महिलासाठी सोडत निघाली आहे. इतर प्रभागांमध्ये यंदा निवडणुकीमध्ये महिला आरक्षण व सर्वसाधारण आरक्षण जाहीर केले. यंदाच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नसल्याचे शिरूरचे प्रांताधिकारी संतोष कुमार यांनी जाहीर केले.
शिरूर नगरपरिषद उद्योगपती रसिकभाऊ धारिवाल सभागृहात सोमवार (दि.13) प्रभाग निहायआरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद बोरकर, कक्ष अधिकारी आयुब सय्यद व कर्मचारी उपस्थित होते.
यंदा एकूण 24 नगरसेवक संख्या असल्याने पन्नास टक्के महिलासाठी आरक्षित असल्याने 12 जागेवर महिलाकरिता राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जातीकरिता 3 जागा असून अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी एक राखीव तर दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. ही सोडत चिठ्ठीद्वारे निघाली तर अनुसूचित जमातीकरिता मागील पंचवार्षिकमध्ये अनुसूचित जमाती व सर्वसाधारणसाठी राखीव असल्याने यंदाच्या वर्षी ही जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाली असल्याचेही शिरूर प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.
आरक्षण सोडत ओबीसी उमेदवाराविना निघाल्याने आरक्षण सोडतीवेळेस नेते व ओबीसी इच्छुक उमेदवार यांनी आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवली होती. पक्षांचे कार्यकर्ते, अध्यक्ष उपस्थित होते. आरक्षण सोडत चिट्ठी शिरुर नगर परिषद शाळा क्रमांक पाचच्या स्वराली कोठावळे, कृतिका मुत्याल या विद्यार्थिनींच्या हस्ते काढण्यात आली