औंध, दि. 2 (प्रतिनिधी) – बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचा 24व्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त धार्मिक, सामाजिक, सहकार, क्रिडा, शैक्षणिक, कायदे विषयक, उद्योग, कृषी, माजी सैनिक, गो-सेवक, आणि आदर्श माता यांना ‘भैरवनाथ पुरस्कार’ देऊन हभप निवृत्ती महाराज देशमुख, ममता सिंधुताई सपकाळ तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक डॉ. दिलीप मुरकुटे यांनी संस्थेच्या प्रारंभापासून तर आजपर्यंत गेल्या 24 वर्षात संस्थेने केलेल्या कामाचा आढावा सांगितला तसेच बॅंकिंग क्षेत्राबरोबरच संस्था करत असलेल्या इतर सामाजिक कामांची माहिती देखील दिली.
ममता सिंधुताई म्हणाल्या की, बॅंकिंग क्षेत्राबरोबरच समाजाभिमुख काम करत विविध गरजूंना नेहमीच मदतीसाठी बाणेर नागरी पतसंस्था विविध उपक्रमात अग्रेसर असते. पतसंस्थेचे उपक्रम कौतुकास्पद आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पुणे बार असोसिएशन अध्यक्ष पांडुरंग थोरवे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, अशोक मुरकुटे, गणपत मुरकुटे, संतोष मोहोळ, राजेश विधाते, पतसंस्थेचे अध्यक्ष राजू शेडगे, उपाध्यक्ष संजय ताम्हाणे, वृषभ मुरकुटे, यशवंत साखरे, राम गायकवाड, सागर भसे, दीपलक्ष्मी बेळगावकर, ऍड. दिलीप शेलार, ऍड. लीना मुरकुटे पाटील, ऍड. संदीप सावंत, ऍड. रविंद्र इंगळे, मान्यवर उपस्थीत होते.