लोणी काळभोर- येथील एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाने ग्राम दत्तक योजनेंतर्गत येथील एमआयटी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे (एमआयटीसीएफटी) हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई हे गाव दत्तक घेतले आहे अशी मा हिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत पवार यांनी दिली. यावेळी हवेली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नवनाथ करंडे, कृषी पर्यवेक्षक गणेश सुरवसे, कृषी अधिकारी युवराज करंडे, कृषी सहायक पद्माजी डोलारे, ग्रामविकास अधिकारी अनिल बगाटे, वाडे बोल्हाईचे सरपंच दीपक गावडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी महाविद्यालयाचे अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञानात पारंगत असलेले 24 विद्यार्थी आणि 3 प्राध्यापक याठिकाणी काम करत आहेत. हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई या गावात या मोहिमेची सुरुवात मंगळवारी (दि. 3) सहायक गटविकास अधिकारी अशोक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.