ल्यूसन – भारताची दुसऱ्या क्रमाकांची महिला ग्रँडमास्टर द्रोणावली हिने महिलांच्या फिडे ग्रांपि स्पर्धेमध्ये विश्वविजेती चीनची खेळाडू जू वेनजुन हिचा पराभव करत विजय नोंदविला.
गुरूवारी झालेल्या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत हरिकाने 29 वर्षीय चीनच्या खेळाडूवर 54 चालीअखेर मात करत विजय मिळविला. तिचा हा स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. याआधी तिने दोन्ही फेरीत बरोबरी साधली होती. तिसऱ्या फेरीनंतर हरिकाचे स्पर्धेत 2 गुण झाले आहेत.
Five players lead #WomenGrandPrixFIDE with 2 points after 3 rounds:
Alina Kashlinskaya (?? 2485)
Aleksandra Goryachkina (?? 2579)
Anna Muzychuk (?? 2535)
Harika Dronavalli (?? 2517)
Nana Dzagnidze (?? 2509)https://t.co/cVoKVMtLZi #chess pic.twitter.com/rXivnI1f85— International Chess Federation (@FIDE_chess) March 4, 2020
पहिल्या फेरीत हरिकाने कनाल सोकोलस्कीविरूध्द आणि दुसऱ्या फेरीत मेरी सेबागविरूध्दच्या लढतीत तिने बरोबरी साधली होती. आता स्पर्धेत चौथ्या फेरीत हरिकासमोर डिग्निजेड हिचे आव्हान असणार आहे.