मुंबई – वेब सिरीज आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममुले मराठी सिनेसृष्टीत अनेक वेग वेगळ्या प्रकारचे विषय केले जात आहेत. त्यातीलच एक सिरीज म्हणजे ‘अथांग’. जयंत पवार यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. याची कथा एका वाड्याभोवती फिरणारी आहे. सस्पेन्स थ्रिलरसह बोल्डनेसचा तडका या सिरींजमधून पाहता येणार आहे.
धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे,संदीप खरे, निवेदिता जोशी – सराफ, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे अशी तगडी स्टारकास्ट या सिरीजमध्ये पाहायला मिळते. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद दिला आहे.
सिरीजचा आशय जुन्या काळातील असला तरी आजवरची सर्वात बोल्ड सिरीज म्हणून ‘अथांग’ सध्या चर्चेत आहे. रानबाजार पेक्षाही जास्त बोल्डनेसचा तडका या सिरीजमध्ये पाहायला मिळतोय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सिरीज म्हणून देखील अथांग सध्या चांगलीच चर्चेत आहे. प्रत्येक भागात वाढत जाणारा सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.