नवीदिल्ली : टोकियो आॅलिम्पिक सुरू होण्यासाठी अवघे सात महिने उरले असताना याआधी भारतीय नेमबाज रवि कुमार आणि बाॅक्सर सुमित सांगवान हे उत्तेजक द्रव्य चाचणीत (डोपिंग) दोषी आढळले आहेत.त्यामुळे त्यांच्यावर ‘वाडा’ने (वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
२९ वर्षीय रविकुमारने शूंटिग विश्व आणि काॅमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते. डोपिंग चाचणीचे निकाल आल्यानंतर त्याला ‘वाडा’ने निलंबित करण्यात आलं आहे. तो आता भारतीय संघाचा सदस्य असणार नाही.
Boxer Sumit Sangwan has tested positive for a substance acetazolamide, which has been banned by World Anti-Doping Agency (WADA).
— ANI (@ANI) December 11, 2019
बाॅक्सर सुमित सांगवान याने बंदी असलेल्या एसिटाजोलमाइड पदार्थाचे सेवन केल्याचे चाचणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याला आता टोकियो आॅलिम्पिक २०२० मध्ये सहभाग घेता येणार नाही. २६ वर्षीय सांगवान याने २०१७ एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले होते.