मुंबई : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
दोन पदवीधर व तीन शिक्षक मतदारसंघातील द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.नाशिक विभाग (४९.२८ टक्के), अमरावती विभाग (४९.६७ टक्के),औरंगाबाद विभाग (८६ टक्के), नागपूर विभाग (८६.२३ टक्के),कोकण विभाग (९१.०२ टक्के) मतदान झाले- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे pic.twitter.com/RoKini39TQ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 30, 2023
नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात 49.28 टक्के, अमरावती विभागात 49.67 टक्के, औरंगाबाद विभागात 86 टक्के, नागपूर विभागात 86.23 टक्के आणि कोकण विभागात 91.02 टक्के मतदान झाले.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरूवार दिनांक 2 फेब्रुवारी2023 ला मतमोजणी होणार आहे, अशी माहितीही श्री.देशपांडे यांनी दिली.