नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफत सोन्याचा दर 80 रुपयांनी कमी होऊन 56,860 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 180 रुपयांनी कमी 68,795 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला होता.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,923 डॉलर आणि चांदीचा दर 23.66 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. या आठवड्यात फेडरल रिझर्व्हचे पतधोरण जाहीर होणार असल्याने काही गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्यामुळे सोने आणि चांदीच्या घरात घट होत असल्याचे दिसून येत आहे असे विश्लेषकाकडून सांगण्यात आले.