नवी दिल्ली: ट्विटरचे सीईओ एलोन मस्क ट्विटरमध्ये नवीन फीचर्स जोडण्याची तयारी करत आहेत. मस्क यांनी जाहीर केले आहे की ट्विटर युजर्स इमोजीसह थ्रेडमधील कोणत्याही संदेशाला थेट उत्तर देऊ शकतात. याशिवाय मस्कने असेही सांगितले आहे की, ट्विटर आगामी काळात त्यांच्या प्लॅटफॉर्मवर व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट सुरू करणार आहे.
ऍलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून रोज नवीन निर्णय घेण्याचा धडाकाच सुरु केला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतले. तसेच त्यांच्या भूमिकेविरोधात जगभरातून टीका होत आहे. अशात मस्क यांनी पुन्हा एक नवीन निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय त्यांनी ट्विटच्या माध्यमातूनच जाहीर केला आहे.
With latest version of app, you can DM reply to any message in the thread (not just most recent) and use any emoji reaction.
Release of encrypted DMs V1.0 should happen tomorrow. This will grow in sophistication rapidly. The acid test is that I could not see your DMs even if…
— Elon Musk (@elonmusk) May 9, 2023
मस्क आपल्या ट्विटमध्ये म्हणतात , “अॅपच्या नवीन आवृत्तीसह, तुम्ही थ्रेडमधील कोणत्याही संदेशाला DM करू शकता आणि कोणतीही इमोजी प्रतिक्रिया वापरू शकता. एनक्रिप्टेड DMs v1.0 रिलीज होणार आहे. ते वेगवान असेल.” माझ्या डोक्यावर बंदूक ठेवूनही मी तुमचा डीएम पाहू शकत नाही. लवकरच तुमचे हँडल या प्लॅटफॉर्मवर कोणाशीही व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट करण्यास सक्षम असेल, ज्यामुळे तुम्ही फोन नंबर न देता जगातील कोठेही लोकांशी बोलू शकता.DM ची सुविधा 11 मे पासून सुरू होणार आहे. ”