पुतीन यांनी उभारला 10 हजार कोटींचा महाल?

विरोधी नेत्याने जारी केला व्हिडीओ

मॉस्को – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या एका सीक्रेट महालाची माहिती समोर आली असल्याचे वृत्त आहे. पुतिन यांचे सर्वात मोठे टीकाकार विरोधी पक्षाचे नेते एलेक्‍सी नवेलनी यांची अटक 17 जानेवारीला झाली होती. अटकेपूर्वी पहिल्यांदा नवेलनीनं एक व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं होतं, जे त्यांच्या टीमनं सोशल मीडियावर अपलोड केलं. या व्हिडीओत नवेलनी यांनी पुतिन यांच्या सीक्रेट महालासंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे.

या व्हिडीओत नवेलनी यांनी दावा केला आहे की, रशियाच्या राष्ट्रपतींजवळ 100 अब्ज रुपयांचा सीक्रेट महाल आहे. दक्षिण रशियाच्या जेलेंजिक नावाच्या शहरामध्ये हा महाल असून, काळ्या सागराच्या तटावर तयार करण्यात आलाय.

हा महाल जंगलाच्या मधोमध जवळपास 170 एकरांमध्ये पसरलेला आहे. यात हॅलिपॅड, वाइन भंडार, स्पा, कॅसिनो, सिनेमाघर याशिवाय चैनीची प्रत्येक वस्तू आहे. तसेच महालमध्ये आइस हॉकीसाठी स्टेडियम आणि चर्चसुद्धा आहे. महालामधून थेट समुद्राच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी सीक्रेट भुयारी मार्गही करण्यात आला आहे. ही रशियाची सर्वात मोठी खासगी मालमत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

नवेलनीच्या माहितीनुसार, महालाच्या आसपास 77 वर्ग किलोमीटरच्या जमिनीवर रशियाच्या गुप्तचर यंत्रणांचा कंट्रोल आहे. हा महाल नो फ्लाय झोनमध्ये आहे. हा महाल एका राज्याच्या अंतर्गत असून, इथे जार यांची सत्ता चालते. या महालातून जमीन, हवा आणि पाण्याद्वारे पोहोचू शकत नाही. महालामध्ये काम करणारा कोणताही कर्मचारी कॅमेरा घेऊन आत जाऊ शकत नाही.

दरम्यान, ही नवी माहिती उजेडात आल्यानंतर रशियातील पुतीन विरोधी निदर्शक अधिकच उग्र झाले असून, पुतिन यांच्या ऑफिसनं हा दावा फेटाळून लावला आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, 40 हजार लोकांनी निदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. रशियात एवढ्या मोठ्या प्रमाणात निदर्शने करणं ही एक अभूतपूर्व घटना आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.