पुणे – पुणे विभागात 80 टक्के लसीकरण झाले असून 8 हजार 600 पैकी 6 हजार 880 लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. पुणे ग्रामीणमध्ये 2500 पैकी 1713 लाभार्थ्यांनी लस घेतली.
येथे 69 टक्के लसीकरण झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 900 पैकी 675 जणांनी लस घेतली तर, 75 टक्के लसीकरण झाले. पुणे शहरात 1600 पैकी 1431 लाभार्थ्यांनी लस घेतली, एकूण 89 टक्के लसीकरण झाले. अशाप्रकारे जिल्ह्यात 5000 पैकी 3819 लाभार्थ्यांनी लस घेतली तर एकूण 76.4 टक्के लसीकरण झाले.
सातारा जिल्ह्यात 1600 लाभार्थी होते. परंतु, 1730 लाभार्थ्यांना लस दिली आणि टक्केवारीनुसार 108.1 टक्के लसीकरण झाले. सोलापूर जिल्ह्यात 2000 पैकी 1331 लाभार्थ्यांनी लस घेतले आणि 67 टक्के लसीकरण झाले.