नवी दिल्ली – नेशन्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत भारताने युरोपशी 2-2 अशी बरोबरी करत आपली आगेकूच कायम राखली आहे. ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदने या सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत रशियाचा ग्रॅंडमास्टर इयान नेपोमनियाचशीचा केवळ 17 चालींमध्ये पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली.
त्यानंतर बी. अधिबान आणि द्रोणावल्ली हरिका यांनी सर्जी कर्जकिन आणि ओल्गा गिर्या यांच्याशी बरोबरी केली व भारताला रशियाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने सध्या जगभरातील अनेक खेळाडू ऑनलाइन स्पर्धा आयोजित करताना दिसत आहेत.