महाराष्ट्राच्या कबड्डी वर्तुळात विशाल माने हे एक लोकप्रिय नाव आहे. 21 सप्टेंबर 1985 रोजी जन्मलेल्या विशालने चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी कबड्डी गांभिर्याने खेळायला सुरुवात केली. विशाल मानेचे शालेय शिक्षण डॉ. शिरोडकर हायस्कूल आणि पदवीचे शिक्षण एमडी कॉलेज, मुंबईतून झाले. विशाल माने याची पत्नी प्रियांका झेंडे सुद्धा कबड्डीपटू आहे. महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेदरम्यान त्यांची भेट झाली होती.
विशालने शालेय जीवनापासूनच कबड्डी खेळत होता. मात्र कबड्डीमध्ये कारकिर्द करण्याचा त्याचा कधीही विचार नव्हता. पुढे महाविद्यालयात शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार विजेत्यां खेळाडूंसोबत कबड्डी खेळण्याची संधी विशालच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरला.
विशालने 2004 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी हरियाणा येथे पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले. त्यावेळी संघात बी.सी रमेश याच्यासह इतर दिग्गज खेळाडूंचा समावेश होता.
विशालने कमी काळात आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर मध्य रेल्वे नोकरी पटकावली. पुढे भारतीय रेल्वेला राष्ट्रीय स्पर्धेत 2008 मध्ये सुवर्णपदक जिंकूण देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. त्या संघात मनजीत छिल्लर, राकेश कुमार, संजीव बालियान यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होता.
उजव्या कोपर्यात बचावपटू म्हणून खेळणार्या विशाल मानेने प्रो कबड्डी लीग कारकिर्दीची सुरुवात यू मुंबातून केली. तसेच स्पर्धेच्या दुसर्या हंगामात यू मुंबाच्या विजेतेपदामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. आतापर्यंत यू मुंबा, बंगाव वॉरिअर्स, पटना पायरेट्स आणि दबंग दिल्लीकडून खेळलेला विशाल प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक 5 अंतिम सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे.
प्रो कबड्डीच्या कारकिर्दीत विशालला जास्त गुण मिळवण्यात जरी यश आले नसले तरी कोणत्याही संघातील त्याची उपस्थितीती इतर खेळाडूंसाठी मार्गदर्श आणि प्रेरणादायी असायची. मात्र, यंदाच्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावत विशालवर कोणत्याही संघाने बोली न लावल्याने तो प्रथमच या स्पर्धेला मुकणार आहे.
विशाल मानेची कामगिरी :
विशाल मानेचा प्रो कबड्डी लीगमधील प्रवाससामने – 128
एकूण गुण- 198
चढाईतील गुण- 1
बाचावातील गुण- 197