2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची वेळ जवळ आली आहे आणि करदात्यांजवळ दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र या दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. सीबीडीटीने ई-फाइल केलेल्या आयटीआरच्या पडताळणीची अंतिम मुदत 2022 पर्यंत वाढवली आहे.
ITR भरल्यानंतर पडताळणी आवश्यक
प्रत्येक कमावत्या व्यक्तीने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे आवश्यक आहे. आयटीआर दाखल केल्यानंतर, त्याची पडताळणी करणे देखील आवश्यक आहे, त्याशिवाय फॉर्म अपूर्ण मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, आयटीआर भरण्याची शेवटची पायरी म्हणजे फॉर्म सबमिट करणे नव्हे तर पडताळणी ही आहे. तुम्ही ते फक्त ऑनलाइन पडताळणी करू शकता.
28 फेब्रुवारीपर्यंत करता येईल ई-व्हेरिफिकेशन
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ITR पडताळणीची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या पडताळणी प्रक्रियेशिवाय, ITR भरण्याची प्रक्रिया पूर्ण मानली जाणार नाही. जर आयटीआर निर्धारित कालावधीत पडताळणी केला नाही तर ते अवैध मानले जाते.
३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार आयटीआर
हे लक्षात घेण्यासारखे आहे की आर्थिक वर्ष 2020-21 साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. यापूर्वी विभागाकडून आयटीआर भरण्याची अंतिम तारीख दोनदा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर गतवर्षीप्रमाणे जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळणे अपेक्षित आहे.
या प्रकारे करा ITR पडताळणी
*सर्व प्रथम https://www.incometax.gov.in वर जा.
*Quick Links अंतर्गत e-verify return च्या पर्यायावर क्लिक करा.
*आधार आणि नोंदणीकृत क्रमांकावरील ओटीपी वापरून पडताळणी पर्याय निवडा.
*यानंतर तुम्हाला e-verify स्क्रीनवर क्लिक करावे लागेल.
*आधार OTP स्क्रीनवर ‘Agree to Verify Aadhaar Details’ निवडा.
*त्यानंतर जनरेट आधार ओटीपी पर्यायावर क्लिक करा.
*आता नोंदणीकृत क्रमांकावर प्राप्त झालेला 6 अंकी OTP टाका आणि Validate वर क्लिक करा.
*OTP योग्यरित्या प्रविष्ट करा, योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी तीन संधी दिल्या जातील.
*पडताळणी केल्यावर, सक्सेस मेसेज आणि ट्रान्झॅक्शन आयडी असलेले पेज उघडेल.
*फाइलिंग पोर्टलवर प्रविष्ट केलेल्या ई-मेल आणि मोबाइल नंबरवर एक पुष्टीकरण संदेश देखील पाठविला जाईल.