मुंबई – मराठी अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’ हिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंटवर “मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक’ असं म्हणतं एक व्हिडिओ शेअर केला होता.
तेजस्विनी पाठोपाठ अभिनेत्री प्राजक्ता माळी, सोनाली खरे यांनी सुद्धा तिला पाठिंबा देत अश्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत ‘बॅन लिपस्टिक’ असं म्हंटलं आहे. यातच या वेबसीरिजचे पोस्टर तेजस्विनी सोशलवर शेअर केले आहे. हे पोस्टर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या सीरिजच्या ठिकठिकाणी लागलेल्या जाहिरातीच्या होर्डिंग्सवर आक्षेप नोंदवत, दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे.
रूपाली चाकणकर यांचे ट्विट
एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमामधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. https://t.co/AsAVztOVL9 pic.twitter.com/vTLWhgsAmN
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 28, 2021