मुंबई – देशभरात अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य महोत्सव साजरा होत असताना प्रत्येकजण आपापल्या परीने स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. अशात लायगर या चित्रपटाच्या निर्मात्यांनीही एका खास पद्धतीने स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या चित्रपटाचे नवीन पोस्टर लाँच केले आहे. या पोस्टरसोबत सुपरस्टार विजय देवराकोंडाचा नवा अवतारही समोर आला आहे. अभिनेत्याच्या या दमदार लूकने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
या चित्रपटाचे नवीन पोस्टर धर्मा प्रोडक्शनने आजच्या खास दिवशी रिलीज केले आहे. पोस्टरमधील विजय देवराकोंडाचा लूक पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. याआधी त्याचा रिलीज झालेला अवतारही लोकांना आवडला होता. याआधी, मात्र नव्या पोस्टरमध्ये तिरंग्यासोबत अभिनेत्याची जबरदस्त बॉडी आणि सिक्स पॅक अॅब्स असलेला लूक लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.
नवीन पोस्टर रिलीज करताना, निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की लक्षात ठेवा…आपण भारतीय आहोत आणि आपण लढवय्ये आहोत… पुढे त्यांनी चित्रपटाची रिलीज डेट लिहिली आहे आणि सांगितले आहे की, लायगर रिलीज होण्यासाठी आता फक्त 10 दिवस बाकी आहेत.
Remember, we are Indians & we are fighters!💪
We wish everyone a Happy 75th Independence Day!🇮🇳
10 DAYS to go for #LIGER worldwide release. 🙌#LigerOnAug25th
_____@TheDeverakonda @ananyapandayy @karanjohar #PuriJagannadh @Charmmeofficial @apoorvamehta18 @RonitBoseRoy pic.twitter.com/CzdzgR7ihw
— Dharma Productions (@DharmaMovies) August 15, 2022
लायगर चित्रपटाची चाहत्यांनी चांगलीच उत्सुकता लागली आहे. साऊथ सुपरस्टार विजय पहिल्यांदाच हिंदी चित्रपट करत असल्यामुळे त्याला पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.