मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे फॅन्स दीर्घकाळापासून तिच्या आगामी ‘गहराइयां’ या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टिझर रिलीज करण्यात आला होता. ‘गहराइयां’ सिनेमा येत्या 11 फेबु्रवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयां’ हा एक रिलेशनशिप ड्रामा आहे. आजच्या जगातील तरूणाईची स्वच्छंद जगण्याची उर्मी आणि यादरम्यानची नात्यांची गुंतागुंत हे सगळं या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
सोशल मीडियावर हा सिनेमा प्रचंड चर्चेत असून, आता सिनेमातील पाहिलं ‘डूबे’ गाणं रिलीज करण्यात आला आहे. दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्रामवर या गाण्याची एक झलक शेअर केली आहे. यामध्ये तिने सिद्धांतसोबत अनेक किसिंग सीन दिसले असून, ती अतिशय मादक दिसून दिसत आहे. संपूर्ण गाण्यात या दोघांची बोल्ड केमेस्ट्री दिसत आहे.
‘गहराइयां’ मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हे सर्व लीड रोल मध्ये असणार आहेत. त्यासोबतच धैर्य करवा, नसीरूद्दीन शाह, रजत कपूर हेही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.