एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत अखेर भाजपच्या पाठींब्याने सरकार स्थापन केले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर राजकीय सामाजिक सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एकनाथ शिंदे यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत ‘तुमचे आशीर्वाद असू द्या’ अशी विनंती केली.
एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारे यांना तुमचं मार्गदर्शन असू द्या आणि जेव्हा तुम्हाला काही वाटेल तेव्हा आदेश करत जा, सूचना करत जा, असंही म्हटलं. यावेळी शिंदे यांनी हजारेंच्या जेष्ठत्वाचा मान ठेवत हात जोडून त्यांच्याशी संवाद साधल्याचे पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदेंसोबतच्या व्हिडीओ कॉलवर अण्णा हजारे यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करत आभार देखील मानले.
VIDEO: "जेव्हा काही वाटेल तेव्हा आदेश करत जा"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अण्णा हजारेंमध्ये व्हिडीओ कॉल संवाद#EknathShinde #AnnaHazare #Shivsena #मराठी #म @mieknathshinde pic.twitter.com/yoJtNlQJ2z
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू 🇮🇳✊ (@PravinSindhu) July 2, 2022
आम्ही राज्याच्या हिताचं काम करू. देवेंद्र फडणवीस, मी व आमचे सहकारी जनतेला अपेक्षित असलेलं काम करू. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत जा असंही शिंदे यावेळी म्हणाले. शिंदे आणि अण्णांच्या संभाषणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.