येरे येरे पाऊस तुला देतो पैसा अशी कविता आजवर आपण ऐकली आहे. आणि पाऊसही पडतांना बघितला आहे. मात्र तुम्ही कधी नोटांचा पाऊस पडतांना बघितला का ? नाही ना मात्र असाच नोटांचा पाऊस सोशलवर पडतांना दिसून आला आहे.
View this post on Instagram
सोशलवर व्हायरल व्हिडियोमध्ये एका कार्यक्रमात नोटांचा पाऊस पडतांना दिसून आला आहे. हा व्हिडियो गुजरातचा असून या मध्ये गायिका उर्वशी रादादिया नावाची महिला गाणं म्हणतांना दिसत असून कार्यक्रमात एक व्यक्ती तिच्यावर नोटांचा वर्षाव करतांना दिसून येत आहे. त्यामुळे उर्वशी ज्या मंचावर बसली आहे तेथे नोटांचा खच पडल्याचे पाहायला मिळते.
View this post on Instagram
तुम्ही कधी नोटांचा पाऊस पडलेला पाहिला आहे का? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये गायिकेवर चक्क नोटांचा पाऊस पडल्याचे दिसत आहे. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले. गुजरातमधील एका कार्यक्रमात गायिका उर्वशी रादादियावर नोटांचा वर्षाव करण्यात आला आहे. कार्यक्रमातीला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, गुजरातमधील अतिशय लोकप्रिय गायिका म्हणून उर्वशीची ओळख आहे. ती काठियावाडाची cuckoo या नावाने ओळखली जाते. ‘नगर नंद जी ना लाल’ या गाण्यामुळे तिला लोकप्रियता मिळाली होती. ती अहमदाबादमध्ये लहानाची मोठी झाली आहे. ६ वर्षांची असताना तिने गाणे गाण्यास सुरुवात केली होती.