आमदार अशोक पवार : घोडगंगा कारखान्यात सत्कार
न्हावरे- शिरूर- हवेलीतील सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते आणि घोडगंगा कारखान्याचे प्रामाणिक कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्यामुळेच ऐतिहासिक मतांनी शिरूर-हवेलीचा आमदार होऊ शकलो, असे प्रतिपादन शिरूरचे नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांनी केले. न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व कामगारांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात आमदार अशोक पवार बोलत होते.
पवार म्हणाले की, घोडगंगाचे कामगार आणि माझे कुटुंबासारखे संबंध आहेत. त्यामुळे कारखान्याच्या कामगारांनी मला कायमच मोलाचे सहकार्य केले आहे. यावेळी आमदार अशोक पवार यांनी सर्व कामगारांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार, घोडगंगाचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, शिरूर तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा विद्या भुजबळ, तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर, घोडगंगाचे माजी कार्यकारी संचालक संभाजीराव पाटील, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखान्याच्या कामगार सोसायटीचे अध्यक्ष हर्षद माळवदकर, अविनाश ढेकाने, व्ही. ए. पाटील, रंगनाथ फराटे, किरण दोरगे, संजय शितोळे, बी. आर. सायकर, दत्तात्रय दरेकर, एस. पी. डुबल, एस. एस. यादव, माणिक कदम, घोडगंगा कारखान्याच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, कामगार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, घोडगंगाचे संचालक बाबासाहेब फराटे, पोपटराव भुजबळ,राजेंद्र गावडे, मनीषा सोनावणे, लतीका वराळे, दत्तात्रय देशमुख,महादेव मचाले, बी. एस. पाटील, संदीप फराटे,यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश ढवळे यांनी तर धनंजय फराटे यांनी आभार केले.