Bollywood : अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय याच दिवशी रणबीर कपूरचा (Ranbeer kapoor) ‘अॅनिमल’ चित्रपट देखील रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आमने-सामने येणार आहे. या दोन्ही सिनेमांची सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. ‘सॅम बहादुर’ चित्रपट रिलीज होण्याच्या आधी विकी कौशलने अमृतसरला जाऊन सुवर्ण मंदिराचं (Golden Temple) दर्शन घेतलं आहे.
अभिनेता विकी कौशलने सुवर्ण मंदिरातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विकी कौशलसोबत मेघना गुलजार (Meghna Gulzar) आणि अभिनेत्री सान्या मल्होत्राही (Sanya Malhotra) दिसत आहे. विकीने फोटो शेअर करत “शुक्र, सब्र, सुकून”, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तर दुसरीकडे, ‘अॅनिमल’च्या रिलीजआधी रणबीर कपूर, बॉबी देओल आणि सिनेमाची संपूर्ण टीम साहिब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी गेली होती.
View this post on Instagram
दरम्यान, ‘सॅम बहादुर’ हा बायोपिक असून सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. ‘सॅम बहादुर’ या सिनेमाचा ट्रेलर 7 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात विकीने फील्ड मार्शल सॅम मानेक शॉ यांची भूमिका साकारली आहे. तर फातिमा सना शेख या सिनेमात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. ‘सॅम बहादुर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता त्यांना सिनेमाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आता रणबीर आणि विकीच्या या चित्रपटांपैकी कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.