मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि विकी कौशल यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. हे दोन्ही कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दोघेही आपल्या चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. इंदूरमधील प्रमोशन संपवून दोघेही दिल्लीला पोहोचले याठिकाणी हे दोन्ही कलाकार दिल्लीच्या रस्त्यांवर फिरताना दिसले.यावेळी विकीने सारासाठी खास गिफ्ट देखील घेतल्याचे पाहायला मिळाले.
विकी कौशल आणि सारा अली खान जनपथ मार्केटमध्ये गेले होते. यावेळी दोघांनी चक्क स्ट्रीट शॉपिंगचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोघांनी विविध लोकल स्टोअर्सला देखील भेटी दिल्या. यावेळी विकीने साराला बांगड्या आणि कानातील झुमके घेण्यासाठी मदत केली.
सारा अली खान आणि विकी कौशल हे दोघेही त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सतत स्पॉट केले जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या फायनलसाठी देखील दोघे दिसले होते. यानंतर आता दिल्लीच्या रस्त्यांवर फिरतानाचे दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
विकी कौशल यावेळी साराला शॉपिंगसाठी मदत करत असल्याने नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच मस्करी केली. ‘कतरीनाला पण घे एखादा झुमका’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर आणखी एकाने ‘आता घरी गेल्यावर याच काही खरं नाही’ असं म्हंटल आहे.