खटाव – येथील परिस शिक्षण संस्थेच्या सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक कार्यक्रम उत्साहात झाले.
शाळेत क्रीडा, फॅन्सी ड्रेस, सोलो डान्स स्पर्धा, विविध गुणदर्शन, ‘अॅन्यूअल डे’चे आयोजन करण्यात आले होते. सपोनि आशिष कांबळे यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रीती पाटील अध्यक्षस्थानी होत्या. गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संत गोरा कुंभार यांची विठ्ठलभक्ती श्रोत्यांनी अनुभवली.
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध गीतांवर नृत्याविष्कार सादर केला. ‘बाईपण भारी देवा’ या गीतावर विद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षिकाही थिरकल्या. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव नलवडे, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, अशोक नलवडे, प्रभावती नलवडे, मुख्याध्यापिका हर्षा रसाळ, रेश्मा शेख, पत्रकार संजय देशमुख, राजेंद्र शिंदे, नम्रता भोसले, शाहीद मुल्ला, पालक उपस्थित होते.
वैभव शिंदे, ज्योती शिंदे, योगिता भांगरे, पद्मा इगावे, अलका खाडे, अश्विनी शिंदे, आरती हेरकर, विद्या कदम, मनीषा शिंदे, नाझिया शेख, स्वप्नाली जाधव, शीतल झिरपे, सुनीता कांबळे, हेमलता मोरे यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.