पिंपरी – उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांमुळे पिंपरी-चिंचवड विकासाचे ’रोल मॉडेल’ झाले आहे. अजित पवार यांचे या शहरावर विशेष प्रेम असून, त्याला साजेसे युवक संघटन उभे राहील, असा विश्वास युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांच्या पुढाकाराने शहर कार्यकारिणीचा पद नियुक्तीपत्र वाटप आयोजित करण्यात आले. काळेवाडी येथे पार पडलेल्या युवक मेळाव्याला शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शाम लांडे, राजेंद्र जगताप, संगीता ताम्हाणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, सरचिटणीस विशाल काळभोर, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, शाम जगताप, अॅड. गौरव लोखंडे, पक्ष प्रवक्ते विनायक रणसुभे, खजिनदार दीपक साकोरे, महिला वरीष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे, मनीषा गटकळ, विजया काटे, संगीता कोकणे, माजी नगरसेवक अॅड. गोरक्ष लोखंडे, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, शोभा पगारे, युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, तुषार ताम्हाणे, प्रसाद कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, तरुणांचा देश म्हणून जगभरात भारताची ओळख आहे. त्यामुळे देशाला उज्वल भविष्य आहे. तरुणांच्या माध्यमातून समाजातील तरुणांचे समाजातील विविध घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. मिळालेल्या पदाचा उपयोग समाजासाठी करावा, असे आवाहनही गव्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन दिपक साकोरे यांनी केले. प्रस्तावना शेखर काटे यांनी केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा संवाद सारखा उपक्रम हाती घेण्यात आला असून, शहराच्या चारही कोपर्यामध्ये युवकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली विकास कामे आणि राष्ट्रवादीचे महत्त्वकांक्षी निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांची तगडी फळी निर्माण करण्याचा आमचा निर्धार आहे.
– शेखर काटे, शहाराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड.