मुंबई – मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारा अभिनेता ‘वैभव तत्ववादी’ लवकरच बॉलिवूडच्या दिग्ज अभिनेत्री सोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
नुकतंच वैभवाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून, या मधून समजतंय की तो ‘त्रिभंगा’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. दरम्यान, न्यू प्रोजेक्टबद्दल सांगितल्यानंतर वैभवने बॉलिवूड अभिनेत्री काजोलसोबत फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
त्रिभंगा या सिनेमाचे दिग्दर्शन रेणुका शहाणे करत असून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुंबईतील एका कुटुंबाची कथा रेखाटण्यात आली आहे. बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका यांसारख्या हिंदी चित्रपटातील वैभवच्या भूमिकांचे देखील चांगलेच कौतुक झाले होते.
View this post on Instagram
Laughter is an instant vacation-Milton Berle Clicked by @shruu_t #Laughter #vtofficial