नवी दिल्ली, दि. 10 – भारतात आतापर्यंत 17 कोटी लोकांना करोनाची लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या या कामाचा वेग जगातील अन्य देशांपेक्षा अधिक आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाचे काम सुरू झाले आहे.
आज सकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 17 कोटी 1 लाख 76 हजार 603 लोकांना करोनाची लस देण्यात आली आहे. 45 ते 60 या वयोगटातील नागरिकांपैकी 5 कोटी 51 लाख 79 हजार 217 जणांना लसीचा पहिला डोस तर 65 लाख 61 हजार 851 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण सध्या सुरू आहे. तथापि, लसीअभावी त्यांच्या लसीकरणाचे काम सध्या धिम्या गतीने सुरू आहे.