बिहार-राजस्थान नंतर आता ‘या’ राज्यातदेखील ‘सुपर30’ करमुक्त

‘सुपर 30′ या शिक्षण संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्यावर आधारीत ‘सुपर 30′ सिनेमाला बिहार व राजस्थान नंतर आता उत्तरप्रदेशमध्ये सुध्दा सरकारने करमुक्त केले आहे.

दरम्यान, आनंद कुमार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेत बायोपिकवर आधारित सिनेमाला करमुक्त करावे अशी विनंती केली होती. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री योगी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी योगी यांनी सिनेमाचे कौतूक केले.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘हा सिनेमा दृढनिश्चयाचे एक उत्तम उदाहरण आहे. सर्व अडचणी असून देखील यश कशाप्रकारे मिळवता येते, हे यामध्ये दाखविण्यात आले असून अशा सिनेमातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि समाजातील तरूणांना शिक्षणाच्या महत्वाबदल जागरूक केले पाहिजे’.

चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या पाच दिवसात सिनेमाने एकंदर 53 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये रविवारी सिनेमाची तब्बल 18 कोटी रुपयांची कमाई झाली होती.

हृतिक रोशनला प्रथमच गरिब आणि प्रामाणिक शिक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहण्याचा वेगळाच अनुभव प्रेक्षकांना मिळाला आहे. या भूमिकेमध्ये तो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्याचे बिहारी ढंगातले बोलणे अगदी अस्सल वाटत असल्याची प्रतिक्रिया चित्रपट रसिकां कडून मिळत आहे.

आनंद कुमार यांच्या बायोपिकच्या निमित्ताने बिहारची पडद्यावरची प्रतिमा उजळली आहे. ‘सुपर 30’ मध्ये गरिब विद्यार्थ्यांना ‘आयआयटी’च्या प्रवेशासाठीचे गणित मोफत शिकवणाऱ्या आनंद कुमार यांची धडपड दर्शवण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)