ustad rashid khan passes away – संगीत जगतातील बादशाह उस्ताद राशीद खान यांचे आज मंगळवारी दुपारी पावणेचार वाजताच्या दरम्यान निधन झाले आहे. ते 55 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबरपासून कोलकाता येथील पीयरलेस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोलकाता येथील पीअरलेस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांचे पार्थिव आज रात्री कोलकाता येथील पीस हेवन रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. उद्या, 10 जानेवारी रोजी गायक राशिद खान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला शोक –
उस्ताद राशीद खान यांना 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “उस्ताद राशीद खान यांच्या अंत्यसंस्कारात त्यांना बंदुकीची सलामी देऊन निरोप दिला जाईल. त्यांचे पार्थिव रवींद्र सदनमध्ये ठेवण्यात येणार आहे. येथे त्यांचे चाहते उस्तादांना अखेरचा निरोप घेऊ शकतील. राशिद खान यांच्या निधनाने संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ते आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे.”
Deeply saddened by the tragic demise of Ustad Rashid Khan, one of the greatest exponents of Indian classical music of our times.
A hugely respected vocalist with unparalleled genius in creating music, he made us proud by settling here and making Bengal his home. He and Soma,…
— Mamata Banerjee (@MamataOfficial) January 9, 2024
उस्ताद राशीद खान कोण होते?
उस्ताद राशीद खान यांचा जन्म 1 जुलै 1968 रोजी उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे झाला. ते रामपूर-सहस्वान घराण्यातील होते. या घराण्याचे संस्थापक उस्ताद इनायत हुसैन खान होते, जे रशीद यांचे आजोबा होत. त्यांच्या संगीत कलेसाठी त्यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असे म्हटले जाते की, प्रसिद्ध पंडित भीमसेन जोशी यांनी रशीद खानचे वर्णन ‘भारतीय संगीताचे भविष्य’ असे केले होते.
उस्ताद राशीद खान यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. निसार हुसेन खान आणि गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून त्यांनी गायनाचे प्रशिक्षण घेतले. उस्ताद राशीद खान यांनी वयाच्या 11 व्या वर्षी पहिला संगीत कार्यक्रम सादर केला. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी कोलकाता येथील ITC म्युझिक रिसर्च अकादमीमध्ये प्रवेश घेतला. ते त्यांच्या गायनाच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणे गायली आहेत.
ही गाणी चित्रपटात गायली –
त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या ‘जब वी मेट’ चित्रपटातील आओगे जब तुम ओ सजना हे गाणे समाविष्ट आहे. याशिवाय त्यांनी ‘किसना: द वॉरियर पोएट’ चित्रपटातील काहे उजाडी मोरी नींद, तोरे बिना मोहे चैन नही, ‘माय नेम इज खान’ चित्रपटातील अल्ला ही रहम, शादी मे जरूर आना चित्रपटातील, तू बनजा गली’ यांसह अनेक गाणे गायली आहेत.