मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई होणार आहे. बिपाशा करण सिंग ग्रोव्हर यांच्या आयुष्यात एक छोटा पाहुणा येणार आहे. बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या गरोदरपणाच्या वृत्ताला काही दिवसांपूर्वी दुजोरा दिला.
View this post on Instagram
बिपाशा बसूची नवीन पोस्ट सोशलवर चर्चेत आहे. नवीन पोस्टमध्ये ही अभिनेत्री तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. नुकताच तिने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी तिचे कौतुक केले. तर काही लोकांनी त्यावर टीका केली. ही आपली भारतीय संस्कृती नाही, असे व्हिडिओ पाहून लोक म्हणत होते.
View this post on Instagram
यापूर्वीही करण सिंग ग्रोवरनेही बिपाशासोबत रोमँटिक पोज दिल्या आहेत. बिपाशाने तिच्या पोस्टमध्ये चाहत्यांचे अपार प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. बिपाशाने पुढे लिहिले,’इतक्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा सदैव आमच्यात राहतील. आमच्या जीवनाचा एक भाग असल्याबद्दल धन्यवाद.’
View this post on Instagram
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहे. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता या जोडप्याच्या आयुष्यात एका छोट्या पाहुण्याचा प्रवेश होणार आहे. चाहते आता या जोडप्याच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत.