वॉशिंग्टन – उत्तर कोरियाने अलिकडेच लघु पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून असे असले तरी उत्तर कोरियाशी चर्चा करण्याची अजुनही अमेरिकेची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे.
तसेच जो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर उत्तर कोरियाने प्रथमच अशा क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. अमेरिका जोपर्यंत आमच्या विरोधातील धोरणांत बदल करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे उत्तर कोरियाने स्पष्ट केले आहे.
कोरियाने चर्चेच्या टेबलावर यावेत अमेरिका सातत्याने प्रयत्नशील असून त्यांनी विविध माध्यमांतून त्या देशाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, उत्तर कोरियाने ज्या क्षेपणास्त्रांचे परिक्षण केले आहे, त्यांच्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेचे कोणतेही निर्बंध नसल्याचे बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पत्रकारांनी यासंदर्भात म्हणजे चाचण्यांच्या संबंधांत थेट बायडेन यांना विचारले असता चाचण्यांना फार महत्व देण्याचे त्यांनी टाळले. बऱ्याच गोष्टी अद्याप बदलल्या नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या चाचण्या म्हणजे कोणती विशेष गोष्ट नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.