बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स उर्वशी रौटेला सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती चाहत्यांशी सतत आपले हॉट ऍण्ड बोल्ड फोटो शेअर करत असते.
आता तिने 35 मिलियन फॉलाअर्सचा टप्पा पार करत अभिनेता रणवीर सिंह यालाही मागे टाकले आहे. उर्वशी रौटेलाची फॅन फॉलोइंग फक्त देशातच नव्हे, तर विदेशातही आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून भरभरून कमेंटस् येत असतात.
उर्वशीने “सिंह साहब द ग्रेट’, “सनम रे’, “पागलपंती’, “हेट स्टोरी 4′ यांसारख्या बीग बजेट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारली आहे. उर्वशीची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे.
ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. उर्वशीच्या आईने नुकताच एक व्हॉट्सऍप मॅसेजमध्ये शेअर केला होता. यात विराट कोहली आपल्या आईला किचनमध्ये मदत करताना दिसत आहे.
याचा स्क्रीनशॉर्ट उर्वशीने सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हे मित्रा मला तुझी मदत हवी आहे. माझ्या आईने मला एक फोटो मॅसेज केला आहे. तुला काय वाटतं? मी काय करू? तिचा हेतू काय आहे? मी घाबरली आहे.’ ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली होती.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास उर्वशी सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती लवरकच “ब्लॅक रोज’ आणि वेब सीरिज “इन्स्पेक्टर अविनाश’मध्ये झळकणार आहे.