अर्बन बॅंकेच्या कर्जवाटपात गफलाच

अहवालात ताशेरे, ग्राहकांनी 250 कोटींच्या ठेवी घेतल्या काढून

नगर  – नगर अर्बन बॅंकेच्या कर्जवाटपात प्रचंड अनियमितता व नियमबाह्य कर्ज दिल्याचे लेखापरीक्षणात अहवालात समोर आले असून याला तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार आहे.यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असे स्पष्ट करत नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी स्पष्ट करत जेव्हापासून प्रशासक बॅंकेवर नेमले आहे आत्तापर्यंत इतर बॅंका व पतसंस्थांनी व ग्राहकांनी 250 कोटी रुपये हे बॅंकेतून ठेवी रूपातून रक्कम काढून घेतली असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.

नगर अर्बन बॅंकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जे कुणी पन्नास हजारापेक्षा जास्त ठेवतील त्यांना आकर्षक अशी भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत बॅंकेचे झालेली वसुली याबाबत मी समाधानकारक नाही, या वेळेच्या लेखापरिक्षण अहवालामध्ये अनियमितता आढळून आलेली आहे ,त्या संदर्भात रिझर्व बॅंकेला अहवाल सुद्धा पाठवला आहे, ज्यांच्यामुळे ही वेळ आली आहे त्यांच्यावर निश्‍चितपणे कारवाई होईल असे मिश्रा यांनी स्पष्ट केले. तसेच बॅंकेने 20 मालमत्तांना टाच लावली असून त्या मालमत्ता बॅंकेने जप्त केल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवनित गांधी, सहाय्यक व्यवस्थापक सतीश शिंगटे, राजेंद्र डोळे ,आदी यावेळी उपस्थित होते. प्रशासक मिश्रा म्हणाले की, बॅंकेच्या ठेवीच्या निर्धारित व्याजदर एक ते दोन वर्षासाठी आठ टक्के तसेच 181 दिवसांसाठी आठ टक्के वरून पाचआठ पोइंट 25% करण्यात आलेला आहे, तसेच जेष्ठ नागरिक दिव्यांग, माजी सैनिकांना सुद्धा मुदत ठेव साठी आम्ही जास्त व्याज देणार आहोत,16 ऑक्‍टोबरपासून एक ते दहा वर्षाच्या कालावधीसाठी अखंड ठेव योजना कार्यान्वित करणार असल्याचेही मिश्रा यांनी यांना सांगून शून्य पॉईंट 15 टक्के ते शून्य पॉईंट पंचवीस टक्के अधिक व्याजदर या ठेवींवर देण्यात येणार आहे.

अर्बन बॅंकेवर प्रशासक नेमला पासून आम्ही वसुली सुरू केली आहे, एन पी अ वसुली 250 कोटी एवढे असून त्यापैकी 24 कोटी रुपये वसूल झाले आहे .झालेल्या वसूली संदर्भात मी समाधानी नाही ,आत्तापर्यंत बॅंकेने वीस जणांच्या मालमत्ता या जप्त केले आहेत तर 70 जणांना मालमत्ता जप्ती प्रकरणासंदर्भात नोटीसही बजावली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बॅंकेच्या संचालक मंडळांना आम्ही दोन वेळा बोलून घेतले होते, त्यांना सुद्धा आम्ही ज्यांना ज्यांना कर्ज दिले आहे त्यांच्याकडून वसुली करून द्यावी असे विषय केले आहेत असे ते म्हणाले.नगर अर्बन बॅंकेची एकूण वसुलीही 800 कोटी रुपयांच्या घरांमध्ये आहे, एवढी वसुली झालीच पाहिजे हीसुद्धा आमची भूमिका आहे. म्हणून जास्तीत जास्त वसुली होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाच टीम त्याकरता नेमले आहेत , बॅंकेतून दररोज संबंधितांना फोन करून त्याबाबत विचारणा सुद्धा केली जात असल्याचे मिश्रा यांनी यावेळी सांगितले.

बॅंकेचे प्राथमिक स्तरावर ऑडिट झाले आहे, यामध्ये पण अ नियमीतता आढळून आलेली आहे , शेरे सुद्धा आले असून त्याचा सर्व अहवाल रिझर्व बॅंकेकडे पाठवण्यात आला आहे ,जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्‍चितपणे कारवाई होईल असेही मिश्रा यांनी सांगून कर्ज प्रकरण मंजूर करण्यात संचालक मंडळ जबाबदार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बॅंकेची सध्याची परिस्थिती पाहता आम्ही सोनेतारण कर्ज बंद केलेले आहे ,कारण सभासदांना पैसे देण्यासाठी ताळमेळ लागायला तयार नाही म्हणून हा निर्णय घेतला आहे. सोनेतारण कर्ज दोन ऑक्‍टोबरपासून सुरू करणार असल्याचे मिश्रा यांनी यावेळी सांगितले. जेव्हापासून प्रशासक बॅंकेवर नेमले आहे आत्तापर्यंत इतर बॅंका व पतसंस्थांनी व ग्राहकांनी 250 कोटी रुपये हे बॅंकेतून ठेवी रूपातून रक्कम काढून घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.