इंग्लंडची महिला क्रिकेटपटू सारा टेलरची निवृत्तीची घोषणा

लंडन – इंग्लंडच्या संघाची यष्टीरक्षक महिला क्रिकेटपटू आणि फलंदाज सारा टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २००६ मध्ये साराने इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल होत. साराने वयाच्या ३० व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे.

दरम्यान, आरोग्याच्या कारणावरून साराने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. साराने तिच्या कारकिर्दीत इंग्लंडकडून १० कसोटी, १२६ एकदिवसीय आणि ९० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. साराने या १३ वर्षाच्या कारकिर्दीत ६५५३ धावा करताना एकूण ७ शतके आणि ३६ अर्धशतके लगावली आहेत. ‘हा निर्णय घेणे अवघड होते, परंतु निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे’, असे निवृत्तीची घोषणा करताना साराने सांगितले. महिला क्रिकेटपटूंमध्ये एक हुशार यष्टीरक्षक आणि धोनीसारखी विकेटकिपींग स्टाईल प्रकार म्हणून साराचा नावलौकिक होता.

Leave A Reply

Your email address will not be published.