मर्यादेपलिकडे इराण करणार युरेनियमचा साठा

इराण युरेनियम :आंतरराष्ट्रीय आण्विक कराराला हरताळ

तेहरान – अमेरिकेसमवेत दिवसेंदिवस बिघडत्या संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर, आपला देश आता अमेरिकेबरोबरच्या वर्ष 2015 मधील आंतरराष्ट्रीय आण्विक कराराला न जुमानता, युरेनियम साठे कराराच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात करणार असल्याचे इराणने जाहीर केले आहे. इराणच्या या निर्णयाच्या आंतरराष्ट्रीय समुदायात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

इराण आणि पश्‍चिमी समुदायामधील संवाद पुन:स्थापित होण्यासाठी आपण 15 जुलैपर्यंत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणचे राष्ट्रप्रमुख हसन रुहानी यांनी दिली होती. मात्र त्यापूर्वीच इराणने आपला निर्णय जाहीर केल्याने अमेरिका-इराणमधील तणावात वाढ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच आण्विक करार एकतर्फी रद्द केल्याने, आता या कराराचे दडपण आपल्यावर नसल्याचे इराणने जाहीर केले होते.

तसेच अमेरिका एकतर्फी आपल्यावर निर्बंध लादत असल्याचे आपण युरोपियन राष्ट्रांच्या लक्षात आणून दिले होते, असेही इराणने म्हटले आहे. तसेच आता वर्ष 2015 च्या कराराविषयी फेरविचार केला जाणार नसल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.