लखनऊ : मिर्झापूर येथील टीव्ही मेकॅनिकची मुलगी सानिया मिर्झाची भारतीय हवाई दलात फायटर पायलट होण्यासाठी निवड झाली असून ती देशातील पहिली मुस्लिम मुलगी आणि राज्यातील पहिली IAF पायलट असेल.
सानिया मिर्झा ही मिर्झापूर देहात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जसोवर गावची रहिवासी आहे. एनडीएची परीक्षा उत्तीर्ण होऊन सानियाने हे स्थान मिळवले. सानिया जिल्ह्याचेच नव्हे तर राज्य व देशाचे नाव लौकिक मिळवले आहे.
हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकणारी सानिया मिर्झा म्हणाली की, ‘हिंदी माध्यमाचे विद्यार्थीही जिद्द बाळगल्यास यश मिळवू शकतात. 27 डिसेंबरला सानिया मिर्झा पुण्यातील खडकवासला एनडीएमध्ये सामील होणार आहेत.’
पालकांसोबतच गावकऱ्यांनाही सानिया मिर्झाचा अभिमान वाटत आहे. सानियाचे वडील शाहिद अली म्हणाले, ‘सानिया मिर्झा देशाची पहिली फायटर पायलट अवनी चतुर्वेदीला आपला आदर्श मानते. पहिल्यापासूनच तिला त्याच्यासारखं व्हायचं होतं. सानिया ही देशातील दुसरी अशी मुलगी आहे, जिची फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे.’
सानियाने प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच पंडित चिंतामणी दुबे इंटर कॉलेजमध्ये केले. यानंतर ती शहरातील गुरुनानक गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये गेली. ती १२वी यूपी बोर्डात जिल्हा टॉपर होती. सेंच्युरियन डिफेन्स अॅकॅडमीमध्ये तिने तयारी सुरू केली.
सानिया मिर्झा या यशाचे श्रेय तिच्या आई-वडिलांसोबतच सेंच्युरियन डिफेन्स अॅकॅडमीला देते. सानिया म्हणाली की, नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी 2022 च्या परीक्षेत फायटर पायलटमध्ये महिलांसाठी फक्त दोन जागा राखीव होत्या. “मला पहिल्या प्रयत्नात जागा मिळू शकली नाही पण दुसऱ्या प्रयत्नात मला जागा मिळाली.”
सानियाची आई तबस्सुम मिर्झा म्हणाली, “आमच्या मुलीवर आम्हाला आणि संपूर्ण गावाला अभिमान वाटला आहे. तिने गावातील प्रत्येक मुलीला तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले आहे.”
नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी 2022 च्या परीक्षेत पुरुष आणि महिला अशा एकूण 400 जागा होत्या. ज्यामध्ये 19 जागा महिलांसाठी तर दोन जागा लढाऊ वैमानिकांसाठी राखीव होत्या. या दोन्ही जागांवर सानियाने आपल्या टॅलेंटच्या जोरावर स्थान मिळवले.