नवी दिल्ली – सीबीआयने लैंगिक शोषणाच्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील पाटबंधारे विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला अटक केली आहे. गेल्या दहा वर्षापासून आरोपी निरपराध मुलांचे लैंगिक शोषण करून गलिच्छ फोटो व व्हिडीओ इंटरनेटवर विकत होता. मंगळवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने चित्रकूट, बांदा आणि हमीरपुर परिसरातील 5-16 वर्ष वय असलेल्या तब्बल 50 अल्पवयीन मुलांचे लैगिक शोषण केले आहे. आरोपीला बांदातून अटक केली असून लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान साबीआयला 8 मोबाईल फोन, 8 लाख रूपये रोख, सेक्स टाॅय, लॅपटाॅप आणि इतर डिजीटल पुरावे मिळाले आहेत. तसेच मुलांच्या लैंगिक शोषणाची छायाचित्रे देखील मिळाली आहेत.
पाटबंधारे विभागाचा हा कनिष्ठ अभियांता गेल्या दहा वर्षांपासून हा गुन्हा करत असल्याचा आरोप आहे. त्याने लैंगिक शोषणाने व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर विकले असून डार्कनेट आणि क्लाऊड सर्वरचा वापर करून जगातील इतर पेडोफाईलसह सामायिक केले.
तो लहान मुलांना आमिष दाखऊन आपल्या जाळ्यात ओढत होता. त्यांना मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रिक गॅझेट्स देऊन तोंड बंद ठेवण्यास सांगत होता. एकामागून एक अशा अनेक प्रकारे त्याने अनेक मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. अखेर त्याला आज सीबीआयने अटक केली.