करहल – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव त्यांचा मुलगा आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या प्रचारासाठी करहलला पोहोचले होते. यावेळी त्यांना अखिलेश यादव येथून निवडणूक लढवत असल्याचे माहीतच नव्हते. त्यामुळे या जागेवरून जो कोणी निवडणूक लढवतो त्याला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
अखिलेश यादव करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. जिथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी मुलायम सिंह यादव पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाषण केले. त्यांच्या उपस्थितीत सपा समर्थक चांगलेच जल्लोषात होते आणि भाषण करताना इथल्या उमेदवाराला मत द्या, असे म्हणाले.
तेव्हा एका नेत्याने मुलायम यांना येथे अखिलेश यादव उमेदवार असल्याची आठवण करून दिली. त्यानंतर अखिलेश येथून उमेदवार असतील तर त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा.
करहल जागेवर भाजपाने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना अखिलेश यादव यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. या रॅलीत अमित शहा यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधत त्यांना हरवणार असल्याचे सांगितले.