प्रतापगड, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील लिलापूर भागामध्ये एक गॅसटॅंकर उलटून झालेल्या दुर्घटनेमध्ये 9 जण ठार झाले. एका टेम्पोला धडक बसल्याने हा टॅंकर उलटला. मरण पावलेले सर्वजण या टेम्पोमधून प्रवास करत होते, असे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात लखनौ ते वाराणसी महामार्गावर जिल्ह्याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर झाला. गॅस टॅंकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका व्हॅनला धडकला आणि उलटला, असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक रोहित मिश्रा यांनी सांगितले.
व्हॅनमधील प्रवासी व्हॅनमध्येच अडकून पडले असून त्यांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना प्रतापगड रुग्णालयात दाखल करण्यात आले तेंव्हा 4 महिला आणि 5 पुरुषांचा उपचारांपुर्वीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.