मुंबई – किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. ‘जवान’चा दमदार प्रिव्ह्यू नुकताच रिलीज झाला. अॅक्शनने भरलेल्या या प्रिव्ह्यूमध्ये ऍक्शन सोबतच फुल ऑन डायलॉगबाजी होती. इतकंच नाही तर शाहरुख खानही व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत होता.
View this post on Instagram
जवानच्या प्रिव्ह्यू व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये चित्रपटाचा टायटल ट्रॅक वाजत आहे. तामिळ चित्रपटांचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंद्र यांनी ‘जवान’ चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्येही पदार्पण करत आहे. पण प्रिव्ह्यूमध्ये ऐकलेले गाणे अनिरुद्धने लिहिलेले आणि गायलेले नाही तर प्रसिद्ध रॅपर राजा कुमारीने गायले आहे.
सध्या तिच्या या रॅपची चर्चा सर्वत्र होत आहे. प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये, शाहरुख खान लाल शर्टमध्ये प्रवेश करताच, मागून एक रॅप वाजतो. त्यात तुम्हाला फक्त ‘किंग खान’ असा या रॅपच्या सुरुवातीला बोलल्याचे समजते. बाकी ऐकायला छान वाटले पण समजत नाही. हा रॅप ‘जवान’च्या टायटल ट्रॅकचा भाग आहे. गाण्यात राजा कुमारी काय म्हणतेय ते लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल की, Running with the King Khan bullets rain down like its thunder …ready or not .. she got the glock …she’ll put you under ..you know we game time on the front line till its over …deep in the trenches for ya .. like a soldier या रॅपने सोशलवर अक्षरश धुमाकूळ घातला आहे.
रॅपर राजा कुमारीचे खरे नाव श्वेता यल्लप्रगदा राव आहे. तो भारतीय-अमेरिकन रॅपर आहे. हिप हॉप स्टार आणि डान्सर राजा कुमारी काही वर्षांपूर्वी अमेरिकेतून भारतात आल्यापासून संगीत उद्योगात धुमाकूळ घालत आहे. राजा कुमारीचे शो नेहमीच भारतीय आणि पाश्चात्य यांचे मिश्रण राहिले आहेत. भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतींचे मिश्रण करून तिने अनेक हिप हॉप सॉंग म्हटले आहे.