महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
बारामती -येथील विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वार मुलांवर बारामती पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्यासह त्यांच्या पालकांना समज देत त्यांना सोडून देण्यात आले आहे.
यापुढेही बारामती शहरात निर्भया पथकाचे कायमच पेट्रोलिंग सुरू राहणार असून त्यांच्याद्वारे मुली, महिलांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
याबरोबरच वाहतुकीचे वेगवेगळे नियम तोडणाऱ्या मुलांवर 10 खटले, 3500 रुपये दंड अशी कारवाई करून सर्व मुले व मुलांचे पालक यांना पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्यासमोर हजर केले आसता मुलांना व पालकांना समज दिली समज देऊन मुलांना पालकांचे स्वाधीन केले व निर्भया पथकाचे फॉर्म भरून घेतले.