वाईत अनधिकृत वाळू उपशावर कारवाई

तीन डंपर, सव्वालाखाची 22 ब्रास वाळू जप्त 

वाई – स्थानिक गुन्हे शाखा व वाईच्या तहसीलदारांच्या पथकाने मंगळवारी (दि. 24) रात्री 11.50 वाजता वाई हद्दीतील वाकेश्‍वर येथे प्रताप वीटभट्टीजवळ अनधिकृतरित्या उत्खनन केलेल्या वाळूचा साठा व वाळूने भरलेले तीन डंपर जप्त केले आहेत.

धनंजय शिंदे व विकास अनपट (रा. बावधन, ता. वाई) यांच्या मालकीच्या एमएच-11-सीएच 3693, एमएच-11-सीएच-3376 व एमएच-11-सीजे-4723 या क्रमांकाचे डंपर जप्त करण्यात आले आहेत. या जागेचे मालक हणमंत आनंदराव थोरवे यांचाही अनधिकृत उत्खनन व चोरीत सहभाग असल्याच्या संशयाने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मंडलाधिकारी व तलाठ्याच्या फिर्यादीवरून एक लाख 32 हजार रुपये किमतीच्या 22 ब्रास शासकीय गौण खनिजाच्या चोरीचा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

कारवाई तहसीलदार रणजित भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंतसिंह साबळे, सहाय्यक फौजदार ज्योतिराम बर्गे, प्रवीण शिंदे, विजय कांबळे, विक्रम पिसाळ, सुधीर बनकर, गणेश कचरे, वाईचे मंडलाधिकारी राजेश झेले, धोमचे मंडलाधिकारी गजानन घाडगे, तलाठी पांडुरंग भिसे, संकेत साळुखे व अभेपुरीचे कोतवाल प्रशांत मांढरे यांनी ही कारवाई केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.