उलगडले अविवाहित राहण्याचे रहस्य

आशा पारेख या अभिनेत्रीने एकेकाळी सिनेसृष्टीसह रसिकप्रेक्षकांच्या मनावरही ताबा मिळवलेला होता. त्याकाळातील आघाडीच्या नायिकांमध्येआशा पारेख यांची गणना व्हायची. असे असूनही त्या आयुष्यभर अविवाहितच राहिल्या. याचे रहस्य काय, त्यांनी हा निर्णय का घेतला याची गुपितं अलीकडेच त्यांनी उलगडली आहेत. आशा सांगतात की, त्याकाळात काम करणाऱ्या नायिकांची अनेकदा फसवणूक होत असे.

दुसऱ्या बाजूला अनेक घटनांमध्येअभिनेते आपल्या पत्नीला विसरुन दुसऱ्या नटीच्या प्रेमात पडायचे. माझ्याबाबत असे काही होऊ नये यासाठी मी एकटी राहण्याचा निर्णय घेतला. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या विवाहाशी निगडित अनेक प्रश्‍नांची विस्तृतपणाने उत्तरे दिली.

अविवाहित राहण्याचा निर्णय हा माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा आणि चांगला निर्णय होता असेआज मी मानते. मुळात, मी एका विवाहित पुरुषावर प्रेम करत होते आणि माझी जराही इच्छा नव्हती की घर फोडणारी स्री बनण्यात मला यत्किंचितही स्वारस्य नव्हते. त्यामुळे साहजिकच माझ्याकडे एकच पर्याय होता की मी सिंगल राहणे. तो मी निवडला आणि आयुष्यभर मी एकटी राहिले.

आपल्या बायोग्राफीमध्ये आशा लिहितात की, त्यांचे दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्यावर प्रेम होते. पण नासिर हे विवाहित असल्यामुळे आशा यांनी त्यांच्यापासून लांब राहणेच पसंत केले. आशा यांचा जन्म मुंबईमध्ये एका गुजराती कुटुंबात झाला. 77 वर्षांच्या आशा पारेख यांनी आपल्या कारकिर्दीत 80 हून अधिक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. यापैकी सात चित्रपटांमध्ये त्या नासिर यांच्यासोबत काम करत होत्या. 1992 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.